बीकेसीतील कार पार्किंगसाठी निविदा

0

मुंबई । वांद्रे-कुर्ला संकुलासाठी विशेष प्राधिकरण म्हणून कार्यरत असणार्‍या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बीकेसीतील कार पार्किंगसाठी निविदा मागवल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बीकेसीतील जी ब्लॉक, प्लॉट क्रमांक सी 56 येथे मल्टिस्टोरेज पार्किंग उभारले आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये जागतिक दर्जाच्या अनेक वित्त कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये यूटीआय, आयसीआयसीआय, आयएल अ‍ॅण्ड एफएएस, नाबार्ड, एनएसई, बीओआय, सिटी बँक, एसबीआय, देना बँक, सेबी, पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्रा बँक आणि कॅनरा बँक यांची मुख्यालये आहेत, तर धिरूभाई अंबानी स्कूल, एशियन हार्ट हॉस्पिटल, डायमंड मार्केट अशा अनेक नामांकित संस्था आहेत. त्यामुळेच बीकेसीतील वाहनांची ये-जा सुरूच असते. भविष्यातील वाढता आर्थिक विस्तार लक्षात घेऊनच एमएमआरडीएने मल्टीस्टोरेज वाहनतळाची स्थापना केली आहे. या पार्किंगमध्ये 850 चारचाकी वाहने पार्क करता येणार आहेत.