जळगाव । मिनी विधानसभा असलेल्या जिल्हा परिषदेची निवडणूक जाहिर होताच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची शोधा शोध सुरु झाली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष हा तुल्यबळ असल्याने या पक्षाच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. भाजपाकडून जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी उमेदवारी देण्यासाठी दोन दिवसापसून इच्छुकांची मुलाखत सुरु आहे. दरम्यान शनिवारी भारतीय जनता पार्टीकडून जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव, पाचोरा,भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, अमळनेर, चोपडा, पारोळा, येथील इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली. जळगाव लोकसभा मतदारसंघातील 33 गट आणि 66 गणातील 560 इच्छुकांनी मुलाखत दिली. मुलाखतीसाठी पक्ष कार्यालयात इच्छुकांसह समर्थकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. इच्छुकांनी रांगा लावल्या होत्या.
महिलांची संख्या अधिक
जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणूकीत महिलांसाठी सर्वाधिक जागा राखीव ठेवण्यात आले आहे. महिलांसाठी अधिक आरक्षण असल्याने मुलाखतीवेळी महिलांची सर्वाधिक गर्दी दिसून आली. उमेदवारीसाठी इच्छुक महिलांनी मुलाखतीसाठी रांगेत उभ्या होत्या. इच्छुक उमेदवारांना अनेक प्रश्न विचारण्यात आल्या. काही प्रश्नांची उत्तरे महिला उमेदवारांना देता येत नव्हते. तुम्ही उमेदवारी का घेई इच्छिता? मतदारसंघाच्या विकासासाठी तुम्ही काय कराल? तुम्हाला उमेदवारी मिळावी असे का वाटत? पक्षासाठी तुम्ही काय करता? तुम्ही निवडूण याल असे कशावरुन? अशा प्रकारचे प्रश्न मुलाखतीत विचारण्यात आले.
तालुकानिहाय मुलाखत
जळगाव जिल्हा परिषद 37 गटाच्या निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवारांची दोन टप्प्यात मुलाखत घेण्यात आली. यात पहिला टप्प्यात रावेर लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गटासाठी मुलाखत घेण्यात आली. शनिवारी झालेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या 33 गटासाठी इच्छुकांची मुलाखती घेण्यात आली. यात चाळीसगाव तालुक्यातील सर्वाधिक 135 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. भडगाव 40, पाचारो 80, अमळनेर 120,धरणगाव 40, एरंडोल 45, पारोळा 30, जळगाव ग्रामीण 70 असे 560 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या.
यांनी घेतल्या मुलाखती
निवडणूकीत चांगला उमेदवार देता यावा यासाठी भाजपाकडून योग्य उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. निवडणूकीसाठी चांगला उमेदवार देता यावा आणि उमेदवारी घेण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराची भुमिका समजून घेण्यासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ, खासदार ए.टी.पाटील, आमदार उन्मेश पाटील, आमदार राजुमामा भोळे, आमदार स्मिता वाघ, पारोळा नगराध्यक्ष करण पवार, संघटनमंत्री अॅड.किशोर काळकर, प्रा.सुनिल नेवे, सदाशिव पाटील यांनी उमेदवारांची मुलाखत घेतली.
सत्ताधारी पक्ष असल्याने इच्छुक अधिक
भारतीय जनता पक्ष हा केंद्रासह राज्यात मागील अडीच-तीन वर्षापासून नंबर एकचा पक्ष असल्याने आणि नुकतीच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणूकीत पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्याने पक्षाची ताकत मोठी असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी पक्ष असल्याने या पक्षाकडून जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. केंद्र व राज्यात सत्ता असल्याने भारतीय जनता पक्षाकडे इच्छूकांचा कौल वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचा फायदा निवडणूक जिंकण्यासाठी होऊन शकतो, असा कयास बांधून इच्छूकांनी गर्दी केल्याचे दिसत होता. तसेच एैन निवडणूकीच्या काळात पक्षात प्रवेश करणार्या आयारामाची संख्या देखील वाढली आहे.