बीसीसीआयला पुन्हा नोटीस!

0

मुंबर्ई। बीसीसीआयचे बुरे दिन संपायचे नाव घेत नाहीयेत. पाकने दिलेली नोटीस ताजी असतानाच आता सरकारच्याच वैध मापन शास्त्र विभागाने बीसीसीआयला नोटीस बजावली आहे. आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि पुणे सुपरजायंट्स यांच्या दरम्यान खेळल्या वानखेडे खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान आवेष्टीत वस्तूंवर अधिक दर आकारल्याने वैध मापन शास्त्र विभागाने बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इंडिया (बीसीसीआय) व मुंबई क्रिकेट असोसिएशन (एससीए)या दोन्ही यंत्रणाना खुलासा करण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. स्टेडीयममधील विक्रेत्यांकडून छापिल किंमतीपेक्षा जास्त दराने वस्तूंची विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार 16 मे रोजी अधिकार्‍यांनी अचानक दिलेल्या भेटीत तीन विक्रेत्यांविरोधात कारवाई केली आहे.

स्टेडीयममध्ये वस्तू विक्रेत्यांकडून फसवणूक
वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक अमिताभ गुप्ता म्हणाले की, विभागाने केलेल्या तपासणीत गरवारे पॅव्हेलीयनच्या पहिल्या मजल्यावर मॅग्नेम कँडी आईस्क्रीम 75 रुपये छापिल किंमत असताना 100 रुपयांना विकली जात होती. तर गावस्कर स्टँडवरील स्टॉल क्रमांक 1 व 3 या दोन्ही स्टॉलवर 55 रुपये किंमतीचे कोरनॅटो आईस्क्रीम 60 रुपयांना विकले जात होते. छापिल किंमतीपेक्षा जास्त दराने वस्तू विकून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित आस्थापनांविरोधात खटले दाखल केल्याचेही गुप्ता यांनी सांगितले. स्टेडियममध्ये वस्तूंची विक्री छापिल किंमतीपेक्षा जास्त दराने होऊ नये, म्हणून बीसीसीआयच्या अनुपालन अधिकार्‍यांनी काय कार्यवाही केली, याबाबतचा खुलासा सादर करावा अशी विचारणा बीसीसीआयला विभागाने केली आहे. शिवाय राज्यातील कोणत्याही स्टेडीयममध्ये वस्तू विक्रेत्यांकडून फसवणूक होत असल्यास वैध मापन शास्त्र विभागाच्या नियंत्रक कक्षास कळवावे, असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे.

हरभजनचे अनिल कुंबळेला भावनिक पत्र!
रणजी करंडक स्पर्धेमध्ये सहभागी होणार्‍या खेळाडूंना दिल्या जाणार्‍या मानधनाच्या मुद्यावर सकारात्मक विचार करण्याची विनंती हरभजनने भारतीय संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळेला पत्राद्वारे केली आहे. भज्जीने पत्रात लिहिले आहे की, गेल्या 2 ते 3 वर्षांपासून मी रणजी स्पर्धेमध्ये खेळतो आहे. प्रथम श्रेणीतील खेळाडूंच्या मानधनाचा संघर्ष हा मला अजिबात आवडत नाही. रणजी क्रिकेट असोसिएशन जगातील एक श्रीमंत बोर्ड आहे, असा उल्लेख ही हरभजनने केला आहे. तुम्ही या सर्व खेळाडूंसाठी एक आदर्श आहात, त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तुम्ही भारतीय नियामक मंडळासोबत चर्चा करावी. माझी अशी विनंती आहे की, सचिन, राहुल, लक्ष्मण आणि विरेंद्र सेहवाग या दिग्गजांशी चर्चा करुन प्रथम श्रेणीतील खेळाडूंना दिल्या जाणार्‍या मानधनाच्या पद्धतीमध्ये बदल करावा. प्रथम श्रेणीमध्ये खेळणार्‍या खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी 1.5 लाख रुपये मानधन दिले जाते.