बुधवारची मुंबई-भुसावळ पॅसेजर रद्द

0

मनमाड रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचे काम

भुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मनमाड रेल्वे स्थानकावर नवीन व जुन्या पादचारी पूलाचे काम मंगळवारी करण्यात आल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूकीसाठी सकाळी 7.25 ते 12.15 असे तब्बल 4.50 तासाचा रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेण्यात आला. यामुळे मुंबई-भुसावळ पॅसेजर ही गाडी बुधवार, 9 रोजीसाठी रद्द करण्यात आली असून असून त्यासोबत मनमाड-ईगतपुरी, ईगतपुरी-मनमाड या गाड्या मंगळवारी रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनमाड येथे जुन्या व नवीन पादचारी पूलाचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. या कामामुळे रेल्वे प्रशासनाने या मार्गावर 4.50 मिनीटाचा ब्लॉक मंगळवारी घेतला. यामुळे या मार्गावरून धावणार्‍या गाड्यांच्या मनमाड स्थानकावरील प्लॅटफॉर्ममध्ये बदल केला गेला. मनमाड-कुर्ला ही गाडी चार ऐवजी पाच क्रमांकाच्या तर भुवनेश्वर कुर्ला, वाराणशी मुंबई, पाटलीपुत्र कुर्ला, छपरा कुर्ला व गोरखपूर कुर्ला एक्स्प्रेस या गाड्या मनमाड स्थानकावर प्लॅटफॉर्म तीन ऐवजी चार वर वळविण्यात आल्यात. तसेच कुर्ला गोरखपूर काशी एक्स्प्रेस ही गाडी समीट रेल्वे स्थानकावर सकाळी 11 ते 12.15 वाजेपर्यत थांबविण्यात आली. रेल्वेच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल झाले. समीट स्थानकावर काशी एक्स्प्रेस सव्वा तास थांबल्याने गाडीतील प्रवाशांचे व लहान मुलांचे चांगलेच हाल झाले.