लंडन: वर्ल्ड कप स्पर्धेत आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना खेळला जात आहे. भारताचा आज पहिलाच सामना आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा आजचा तिसरा सामना आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने दोन सामने गमावले आहे. सामना सुरु झाला असून दक्षिण आफ्रिका प्रथम फलंदाजी करत आहे. भारतीय गोलंदाज जसप्रीत बूमराह हा सुसाट असून त्यांनी सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेला दोन मोठे धक्के दिले आहे. त्याने डी.कॉक आणि हसीम आमलाला बाद केले आहे. केवळ ११ धावा देत त्याने २ विकेट घेतल्या. आमला 6 तर डी.कॉक 10 धावांवर बाद झाला.