बुरखा घालून राखी सावंतला हजर रहावे लागले कोर्टात

0

लुधियाना – रामदेव बाबांनी लग्न केल तरच मी लग्न करेन…अशी बेधडक विधाने आणि रूप प्रदर्शनाने चाहत्यांना अक्षरशः घायाळ करणाऱ्या राखी सावंतला पंजाबमधील लुधियाना शहरातील कोर्टात बुरखा घालून हजर व्हावे लागले. रामायणकर्ते वाल्मिकींवर खळबळजनक भाष्य केल्याबद्दलच्या खटल्यात राखी लुधियानात गुरूवारी हजर झाली. याप्रकरणी न्याय दंडाधिकारी विश्व गुप्ता यांनी तिला जामिन मंजूर केला आहे.

एका टीव्ही शोमध्ये राखीने वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर दाखल झालेल्या खटल्यात हजर राहण्यास ती टाळाटाळ ककरीत होती. राखी सावंतविरोधात दोन जून रोजी अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. लुधियानाच्या पोलिस आयुक्तांना न्यायालयाने राखीला ७ जुलैपर्यंत न्यायालयात हजर करण्यास आदेश दिले होत. यापूर्वीच्या सुनावण्यांना ती गैरहजर राहिली होती. ९ मार्च रोजीही राखीला अटक करण्यासाठी वॉरंट जागी करण्यात आले होते.

लोकांच्या नजरांपासून वाचण्यासाठी राखीला कधी नव्हे ते बुरख्यात जावे जागले. धार्मिक बाबतीत विधाने करणे किती महाग पडू शकते हे राखीला कळले आहे. त्यामुळे ती आता शहाणी होईल, असे तिच्या चाहत्यांना वाटत आहे. त्यांच्या मते बुरखा घालायला लागणे ही राखीला अद्दल घडली आहे.