बुरझड येथे रस्त्यात अडवून 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार

0

धुळे। पतीच्या जेवणाचा डबा घेऊन जाणार्‍या 28 वर्षीय विवाहितेला रस्त्यात अडवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना धुळे तालुक्यातील बुरझड गावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोनगीर पोलीसात नराधमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी अटक केली

आहे.तालुक्यातील बुरझड येथील रहिवासी 28 वर्षीय विवाहिता दि.30 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पतीसाठी जेवणाचा डबा घेऊन शेतात जात असतांना सुरेश भटू कोळी यांच्या शेताजवळ आबा राघो भील (27) याने विवाहितेच्या समोरुन येऊन तिचे तोंड दाबले व रस्त्यालगत असलेल्या नाल्याच्या खड्डयात नेऊन तिच्यावर बलात्कार केला व ही घटना कोणास सांगितली तर कोयत्याने तुझे तुकडे-तुकडे करेल, अशी धमकी दिली.

याप्रकरणी पीडित विवाहितेने सोनगीर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन नराधम आबा भील विरुध्द रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला . पोलिसांनी त्यास अटक केली आहे. तर विवाहितेची येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन. टी. सोनवणो करीत आहेत.