सत्ताधारी सदस्यांसह विराधकांचा आरोप
जळगाव – गेल्या तीन सर्वसाधारण सभांमधून बर्याचदा अंगणवाडीत बुरशीयुक्त शेवया पोषण आहार पुरवठाप्रश्नी पाठपुरावा करूनसुद्धा पोषणआहारपुरवठादारावर कोणतीही कारवाई न होता पुरवठादारास विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार क्लिन चिट देण्यात आली असून अधिकारी हे पुरवठा ठेकेदार यांच्यात हातमिळवणी झाली असल्याचा आरोप सत्ताधारी सदस्यांसह सेना राष्ट्रवादी व कॉग्रेसच्या पदाधिकारी यांनी केला असून जिल्हा परीषदेच्या सदस्यांना एक प्रकारे खोटे ठरविण्यात आले आहे अशी संतापजनक भावना व्यक्त करत महिला बालकल्याण अधिकारी यांना सक्तीच्या रेजवर पाठवण्याची मागणी आज झालेल्या जिल्हा परीषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परीषद सदस्य मधुकर काटे, मनोहर पाटील, नानाभाऊ महाजन, शशीकांत साळुंखे यांच्याव्दारा करण्यात आली.
….सक्तीच्या रजेवर पाठवा
जिल्हा परीषदेत गेल्या ७/ ८ महिन्यांपासून पाचोरा तालुक्यात अंगणवाडीतील बालकांना विविध पोषण आहार अंतर्गत वटाणे,दाळी, अंडी वा कडधान्य युक्त आहार पुरवठा विहित मान्यताप्राप्त ठेकेदाराकडून करतेवेळी बुरशीयुक्त शेवयांचा अन्नपाकीटे पुरवठा करण्यात आला असल्याची तक्रार जिल्हा परीषद सदस्य मधुकर काटे, मनोहर पाटील यांचेसह आदी सदस्यांनी केली होती. याचा पाठपुरावादेखिल या सदस्यांनी केला होता. बुरशीयुक्त शेवया पुरवठा प्रसंगी अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, वा तत्सम अधिकारी यांनी परीस्थीतीजन्य पंचनामे योग्य सादर न करून आहार पुरवठादार ठेकेदार यांस पाठीशी घालुन अभय दिले जात असून हातमिळवणी केली जात असल्याचा आरोप जि.प. सदस्यांनी केला. याठिकाणी बुरशीयुक्त आहार पुरवठा दारास अभय देणारे अधिकारी यांना सक्तिच्या रजेवर पाठवण्याची एकमुखी मागणी यावेळी केली.योजना राबवतांना राज्य शासन ाने निविदाधारकाची निविदा ग्राह्य असून पुरवठादार व शासन यांच्या करारानुसार बालकांच्या खाण्यास अयोग्य पदार्थ आढळून आल्यास संबंधितांनी वरीष्ठांच्या निदर्शनास ३० दिवसाच्या आत हि बाब आणून दयावी. सदोष आहार बदलविण्याची व्यवस्था करण् यात आली आहे याबाबतची जबाबदारी देखिल संबंधित महिला बालकल्याण अधिकारी यांची आहे. ठेेकेदारावर गुन्हा दाखल करावयाचा असल्यास त्याचा रितसर पंचनामा गरजेचा आहे संबंधित वस्तु जप्ती पंचनामा येाग्य करण्यात यावा. यासाठी संबंधती अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, सेविका वा अन्य अधिकारी यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे व याची योग्य ती दक्षता घेतली जाईल असे यावर उत्तर देताना अतिरिक्त सीईओ संजय मस्कर यांनी यावेही स्पष्ट केले.
यावेळी व्यासपिठावर जिल्हा परीषद अध्यक्षा ना. उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिक्षण सभापती पोपट भोळे, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, महिला बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, आरोग्य सभापती दिलीप पाटील, सीइओ शिवाजी दिवेकर, अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, सामान्य प्रशासनचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी बी. टी. अकलाडे आदीसह जिल्हा परीषद सदस्य, १५ पंचायत समित्यांचे सभापती उपस्थित होते.