विवेक वळसे पाटील :
शिक्रापूर । पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावच्या विकास कामांसाठी विशेष सहकार्य केले जात असून बुरुंजवाडी गावातील विकास कामे चांगल्या पद्धतीने चालू आहेत. बुरुंजवाडीच्या विकासाससाठी पुणे जिल्हा परिषदेकडून विशेष निधी पुरवू, असे पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सांगितले. खासदार आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा अॅड. वंदना चव्हाण यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून बुरुंजवाडीत सभामंडप उभारण्यासाठी 10 लाखांचा निधी देण्यात आला आहे. ग्रामपंचायत निधीतून 6 लाखांची विकासकामे करण्यात येणार आहेत.
या कामांचे भूमीपूजन आणि जिल्हा परिषदेने दिलेल्या 12 लाखांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी बुरुंजवाडी गावातील विकासकामांची माहिती घेत कौतुक केले. स्वाती पाचुंदकर, सुभाष उमाप, उध्दव धापसे, माणिकराव टेमगिरे, निळूभाऊ टेमगिरे, पुनमटेमगिरे, विनोद टेमगिरे, बाळासाहेब टेमगिरे, विलास नळकांडे, लताबाई टेमगिरे, अमोल रुके, मेघाताई नळकांडे, हिराबाई टेमगिरे, सोनाली टेमगिरे, डॉ. अविनाश रुके, बबनराव नळकांडे, दत्तात्रय टेमगिरे, रविंद्र उमाप आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच पूनम टेमगिरे यांनी केले तर माजी सरपंच बाळासाहेब टेमगिरे यांनी आभार मानले.