लखनऊ- उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेला हिंसाचार हे मोठे कटकारस्थान असल्याचा खळबळजनक दावा उत्तर प्रदेशचे पोलीस महानिरिक्षक ओ. पी. सिंह यांनी केला आहे.
बुलंदशहरमध्ये ३ डिसेंबर रोजी गोहत्येच्या संशयावरुन हिंसाचार झाला होता. यामध्ये एक पोलीस ठाणे पेटवून देण्यात आले. या हिंसाचारात पोलीस निरिक्षक सुबोध कुमारसिंह यांच्यासह दोन जणांचा मृत्यू झाला होता.
मृत पावलेले पोलीस निरिक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या पत्नीनेही त्यांच्या मृत्यू प्रकरणी खळबळजनक खुलासा केला असून आपल्या पतीला यापूर्वी वारंवार धमक्यांचे फोन येत होते असे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी सुट्टीसाठीही अर्ज केला होता. मात्र, तत्पूर्वी ही दुर्देवी घटना घडली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.