नवी दिल्ली । जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या खेळाडू आयोगावर ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूची सर्वाधिक मतांनी निवड झाली. तिला 129 मते मिळाली. जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर असलेल्या जर्मनीच्या मार्क झ्वीब्लर याला 108, तर स्कॉटलंडच्या कर्स्टी गिल्मूरला 103 मते मिळाली. ही नियुक्ती चार वर्षांसाठी असेल. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये सुदीरामन करंडक स्पर्धेदरम्यान मतदान झाले.