जळगाव । शहरातील लेवा एज्युकेशनल युनियल संचलीत डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यलयात गेल्या दोन वर्षापासून कौशल्य विकास प्रशाळा हा रोजगाराभिमुख प्रशिक्षण केंद्र महाविद्यालयात कार्यान्वित आले आहे. याअंतर्गत शहीद जवानांच्या पत्नी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ‘एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे’ हा उपक्रम राबविण्यात येत असून सहभागी महिलांना मोफत निवास प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणात सहभागी महिलांना फॅशन डिझायनिंग व ब्युटी थेरपीचे तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागातून येणार्या स्त्रियांसाठी मोफत निवासव्यवस्था करण्यात आली असून सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस.राणे, समन्वयक एस.एस.राजपू यांनी पत्रकार परिषदेत दिली.