वाकड : अतिक्रमण कारवाई कारण्यासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचार्यांना रोखण्यासाठी इमारत मालकाने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्त्येचा प्रयत्न केला. हा प्रकार वाकड येथे मंगळवारी (दि. 24) दुपारी साडेपाचच्या सुमारास घडला. या प्रकरणी कैलास लक्ष्मण भुजबळ (वय 51, रा. जमदाडे वस्ती, वाकड, ता. मुळशी, पुणे) यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा
पुणे महापालिकेचे कनिष्ठ अभियंता मनोज बोरसे (वय 48) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते महापालिका अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यासोबत वाकड येथे बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेले. त्यावेळी रॉकेलचे कॅन घेऊन कैलास भुजबळ आले. त्यांनी मनोज यांना बांधकाम पाडायचे नाही, अन्यथा मी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करेन. माझ्या या आत्मदहनाला महापालिका आणि कर्मचारी जबाबदार असतील, अशी धमकी दिली. यानंतर पोलिसांनी त्यांना अडवून आत्महत्त्येपासून परावृत्त केले. दरम्यान, सरकारी कामात अडथळा निर्माण करून काम बंद पाडले. यावरून गुन्हा दाखल करत भुजबळ यांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश आबनावे तपास करीत आहेत.