बेकायदा नोकरभरती अपात्रतेची कारवाई करा

0

मुक्ताईनगर । ग्रामपंचायतमध्ये झालेली नोकर भरती ही बेकायदेशीर असून भविष्यात होणार्‍या नगरपंचायत किंवा नगरपरिषद प्रस्तावित असून त्याचा लाभ घेण्याकरिता सरपंच आणि सदस्यांनी शासनाच्या नियमांची पायमल्ली करून ही भरती केली आहे. ती तात्काळ रद्द करून सदस्यांना अपत्रतेची कार्यवाही करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

येथील कर्मचारी भरती ही अवैद्य असून मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन 1958 कलम 61 नुसार सरपंच यांना तात्पुरती नोकर भरती करण्याचे अधिकार आहेत. परंतु सरपंच यांनी महाराष्ट्र शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवत बेकायदेशीररित्या नोकर भरती केली आहे. तसेच महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचे परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्ना पैकी कर्मचार्‍यांच्या वेतनावर 35 टक्के पेक्षा जास्त खर्च करता येत नाही. तरीही मुक्ताईनगरचे सरपंच यांनी शासनाच्या सर्व आदेशांची पायमल्ली करत ही अवैद्य नोकर भरती केली. तसेच गेल्या 20 वर्षात नोकर भरती करीत कोणत्याही वर्तमान पत्रात जाहिरात दिली नाही. किंवा उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या नाही, उमेदवारांची कुठलीही शैक्षणिक पत्रात संबंधित कागदपत्रे घेतली अथवा तपासली नाही. फक्त सरपंच व सदस्य यांनी आपापल्या नातेवाईकांना अनधिकृतपणे भरती करून घेतले. तरी होणार्‍या उत्पन्नापैकी 60 टक्केच्यावर खर्च हा कर्मचार्‍यांच्या वेतनावर केला जातो. व त्यामुळे ग्रामनिधींवर बोजा पडून विकास कामे पूर्ण होत नाहीत. तरी सरपंच आणि सादस्यांचा गैरकारभार आणि स्वतःचे हितसंबंध जोपासल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करून त्याच्यावर कारवाही व्हावी अन्यथा मुक्ताईनगर शिवसेना उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल अशा प्रकारचे निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देताना सुनील पाटील, राजेंद्र हिवाराळे, प्रशांत टोंगे, अमरदिप पाटील, चेतन पाटील, निलेश बोरखेडे, आनंदा ठाकरे, प्रफुल पाटील, भूषण वानखेडे यांसह असंख्य बेरोजगार आणि शिवसैनिक उपस्थित होते.