पिंपरी : अनधिकृत फलकांमुळे शहराचे सौंदर्य विद्रुपीकरण होत आहे. यापुढे शहरात एकही अनधिकृत होर्डिंग्ज किंवा फलक आढळून येता कामा नये, त्यासाठी नवीन धोरण ठरवून तातडीने कार्यवाही करा, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आकाश चिन्ह परवाना विभागाला दिले आहेत.
बैठकीत परवाना विभागाकडून फलकांबाबत आढावा घेतला. त्यावर सहाय्यक आयुक्त विजय खोराटे यांनी फलकांबाबत माहिती दिली. त्यावर बेकायदेशीर फलकांबाबत स्वतंत्र धोरण ठरवण्यात यावे. धोरणामध्ये फलक लावणारा नोंदणीकृत नसेल तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले.