बेकायदेशीर दारू वाहतूक करणार्‍यांना अटक

0

शिरपूर । तालुक्यातील निमझरी गावाजवळ मध्यप्रेदशातून बेकायदेशीररित्या एका स्विफ्ट डिझायर गाडीतून दारूची वाहतूक करतांना पोलीसांनी दोघांना रंगेहात पकल्याची घटना शनिवार 22 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता घडली. या कारवाईत वाहनासह 2 लाख 80 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोनि अनिल वडनेरे हे हजर झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिलीच कारवाई झाली आहे. मध्यप्रदेशातून बेकायदेशीररित्या गाडी क्रमांक एमएच 20-9586 ही दारू घेवून येत असल्याची माहिती पोनि वडनेरे यांनी मिळाली.

पोलिस निरीक्षक समाधान वाघ, मुकेश गुजर, अखिल पठाण, नेरकर यांच्या पथकाने सापळा रचून मिमझरी गावाजवळे गाडी पकडली. या गाडीत 80 हजार 400 किंमतीची बॉम्बे स्पेशल व्हिस्की 240 बाटल्या मिळून आल्यात. हा माल पाचोरा येथे नेला जात असल्यची माहिती गाडीतील अनिल कडू वाडले (वय 42) रा. पाचोरा जि. जळगाव व नितीन सिद्धार्थ सोनवणे (वय 23) रा. वरखेडा ता. पाचोरा यांनी दिली. या कारवाईत 2 लाखाची गाडी व 80 हजार 400 रूपयांची दारू असा एकूण 2 लाख 80 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पोकॉ प्रविण नेरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल व नितीन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि अनिल वडनेरे करीत आहेत.