जळगाव। येथील जमीअत-ए-उलमा संस्थेतर्फे दि. 9 जुलै रविवार रोजी संध्याकाळी 7 वाजता इकरा एच.जे. थिम महाविद्यालय, मेहरुणच्या पटांगणात अब्दुल वाहीद शेख लिखीत “बेगुनाह कैदी” या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. प्रकाशनासाठी माजी न्यायमुर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे मा. कोळसे पाटील, ज्येष्ठ पत्रकार व तहलका डॉट कॉमचे अजित साही प्रमुख पाहुणे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालेगाव कुळ जमाती कौन्सीलचे अध्यक्ष मौलाना अ. हमीद अजहेरी उपस्थित राहणार आहे.
7/11 मधून निर्दोष झाल्यावर लिहिले पुस्तक
विशेष बाब म्हणजे 7/11 बॉम्ब ब्लास्ट मुंबई येथील शिक्षक अ.वाहीद शेख यांना पोलिसांनी अटक करुन कारागृहात टाकले होते. डिसेंबर 2015 चा निकाल मुंबई न्यायालयाने देऊन त्यांना दोषमुक्त-निर्दोष म्हणून सुटका केली. 9 वर्षे अ. वाहीद शेख हे मुंबईच्या कारागृहात राहिल्यानंतर ‘निर्दोष’ सुटल्याने त्यांनी स्वत: ‘बेगुनाह कैदी’ हे पुस्तक लिहिले आहे.
जमीअत-ए-ऊलमाचा उपक्रम
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक जिल्हा जमीअत-ए-ऊलमा असून अध्यक्ष मुफ्ती हारुन नदवी असून अध्यक्ष मुफ्ती हारुन नदवी असून भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, राष्ट्रवादी महाराष्ट्र अल्पसंख्यांकचे अध्यक्ष अलहज अ. गफ्फार मलीक, इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अलहज अ. करीम सालार व जळगाव जिल्हा मुस्लीम मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त हिंदू व मुस्लीम बंधुंनी या कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन मुफ्ती हारुन नदवी यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.