पिंपरी-चिंचवड : मेट्रोच्या कामामुळे शहरावर अनेक संकटे येवू लागली आहेत. सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता, महामेट्रो प्रकल्पाकडून दुर्लक्ष होत आहे. नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने खासगी बससह अनेक वाहन चालक सुखरुप बचावले आहेत. मेट्रोच्या बेजबाबदार अधिकारी व ठेकेदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली.
हे देखील वाचा
सदरील मेट्रोच्या पडलेल्या ड्रिलिंग मशीनची विरोधी पक्षनेते साने यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात महामेट्रोकडून बेजबाबदारपणे मेट्रोचे काम केले जात आहे. सुरक्षितेची कोणतीही दक्षता घेतली जात नाही. मेट्रोकडून कामाची माहिती देखील दिली जात नाही. यापुढे महामेट्रोने सुरक्षिततेची काळजी घेऊन काम करावे, असेही साने म्हणाले.