बेटावदमधील लाचखोर सहाय्यक अभियंता जाळ्यात

0
नवीन वीज मीटरसाठी घेतली दोन हजारांची लाच
धुळे – नवीन वीज मीटर घेण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना बेटावद (ता.शिंदखेडा) येथील वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. पडावद येथील 57 वर्षीय तक्रारदाराने या प्रकरणी एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश भोरटेकर व पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईने वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली.