बेटावद । शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील मोठे मकान मुस्लीम पंच कमेटीच्या बांधकामासाठी जागेची सपाटीकरण करत असतांना जुन्या खोल्यांच्या ठिकाणी ते पाडल्या नंतर अचानक 25 ते 30 फुट लांबीचे व अंदाजे 3 फुट रूदींचे भुयार निघाले. भुयार निघाल्यानंतर भुयार पाहण्यासाठी नागरीकांनी गर्दी होत आहे. सदरहु भुयार ओलसर असुन त्यास दर्गाकडे जाण्यासाठी रस्ता असल्याचे दिसत आहे. यापूर्वी सुद्धा 15 ते 20 वर्षापूर्वी गांवात असे अनेक भुयार निघालेले आहे. त्यावेळी नागपूर भुवैज्ञानिकांनी गावाचा सर्वे केलेला होता, त्यानंतर पुन्हा बाजार पेठेत भुयार निघाल्याची प्रचुती बेटावद करांना आलेली आहे.