बेटावद ता.शिंदखेडा। बेटावद येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती नुकतीच साजरी झाली. यावेळी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी ग्रा.पं.चे सरपंच अरूण देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष नथा आबा पाटील, उपसरपंच रहीम खाटीक, प्रा.बी.एम.पाटील, विरेंद्र पवार, भाईदास कोळी, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र अहिरराव, विजय महाजन, आर.आर.सोनवणे, करूणा निधी अहिरराव, जितेंद्र कोळी, चंद्रकांत निष्काळजे, शिवाजी माळी, परेश जैन, एस.पी.माळी आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी पुण्यतिथी व जयंतीनिमित्ताने थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैभव माळी, महेंद्र माळी, दिपक माळी, हेमंत देशमुख, किरण वाणी, विलास महाले, रमेश गायकवाड, बाबुराव गायकवाड, देविदास गायकवाड, राजू कांबळे, रवींद्र गायकवाड, दिपक कांबळे, कृष्णा कांबळे, युवराज गायकवाड, मुकेश कांबळे, चिंतामण पाचारकर आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन हिम्मतराव माळी तर आभार वैभव माळी यांनी मानले.