बेडर रामोशी समाजाचे विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन

0

चाळीसगाव। चाळीसगाव शहरातील बेडर, बेरड रामोशी समाजाच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन बुधवार 26 जुलै 2017 रोजी तहसीलदार चाळीसगाव यांना देण्यात आले आहे. इंग्रजांच्या विरोधात पहिले बंद पुकारणारे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती 7 सप्टेंबर 2016 रोजी कृती समितीच्या वतीने भिवडी स्मारक जिल्हा पुणे येथे झाली. वेळोवेळी निवेदने देऊन देखील शासन स्तरावर दाखल घेतली जात नाही. रामोशी समाज सामाजिक, आर्थिक शैक्षणिक राजकीय दृष्ट्या वंचित आहे.

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती 7 सप्टेंबर रोजी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी करावी त्यांच्या भिवडी जन्मगावी राष्ट्रीय स्मारक उभे करण्यासाठी निधीची तरतूद करावी महाराष्ट्रातील इदाते समितीच्या 1999 च्या रामोशी समाजातील 75 टक्के भूमिहीन असलेल्या 96 टक्के कुटुंबाना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळाला नाही 13 हजार रुपये वर्षीय उत्पन्न असल्याचे आढळून आले आहे. यावेळी प्रकाश यादव वाघ, नागराज वाघ, रमेश वाघ, नितीन सूर्यवंशी, नितीन वाघ, मंगेश शिंदे, रमेश वाघ, भाऊसाहेब सूर्यवंशी, जिभाऊ शिंदे, भास्कर मोरे आदी उपस्थित होते.