बेडापाडा येथे वृद्धासह लहान मुलावर अस्वलचा हल्ला

0

तळोदा: तालुक्यातील मोहिदा येथील अस्वलाच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार झाल्याची दुर्देवी घटना ताजी असतांनाच तालुक्यातील बेडापाडा येथे गावाजवळील शेताच्या रस्त्यावर अस्वलाने एका लहान मुलासह वृद्ध व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेत दोघांना दुखापत झाली असून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
नारायण गणा वळवी (वय 58) यांच्यावर आणि अनिल वसावे (11) यांच्यावर अस्वलाने हल्ला केला.