नवी दिल्ली: हवाई दलाचे मालवाहतूक विमान हे गेल्या काही दिवसापासून बेपत्ता झाले आहे. त्याचा काही थांगपत्ता लागला नसून त्याचा शोध सुरु आहे. या हवाई दलाच्या विमानाची माहिती देणाऱ्यास पाच लाखाचे रुपयाचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
हवाई दलाचे एएन-३२ मालवाहतूक विमान ३जुन पासून बेपत्ता झाले आहे. या विमानात आठ कर्मचारी आणि पाच जवान आहे. संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर मार्शल आर. डी. माथूर, इन कमांड, इस्टर्न एअर कमांड यांनी या बेपत्ता विमानाची माहिती सांगणाऱ्याला पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. बेपत्ता विमानाच्या लोकेशनची माहिती ०३७८-३२२२१६४,९४३६४९९४७७, ९४०२०७७२६७, ९४०२१३२४७७ या क्रमांकावर देता येईल असे ही विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी म्हटलं आहे.
एएन-३२ या विमानाने दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी आसामच्या जोरहट तळावरुन अरुणाचल प्रदेशमधील मिचुका येथे जाण्यासाठी उड्डाण केले होते. त्या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटून बेपत्ता झाले आहे. वैमानिक आशिष तन्वर (२९) हेही बेपत्ता झाले. त्यांची पत्नी संध्या हवाई दलाच्या वाहतूक नियंत्रण कक्षात सेवेवर असतांना त्यांच्या डोळ्यासमोर पायलट पतीचे विमान रडारवरून गायब झाले.