बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबत सामाजिक उपक्रम राबवणार

0

संतोष बारसे ; चाळीसगावात पहेलवान पुत्र ग्रुपचे शाखेचे उद्घाटन

चाळीसगाव- बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासह सामाजिक उपक्रम राबविणार आपला भर राहणार असल्याची ग्वाही भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे यांनी येथे दिली. शहरातील रामदेवजी बाबा नगरात पहेलवान पुत्र ग्रुपचे शाखेचे उद्घाटन सोमवारी त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन कार्यक्रमास विक्की आबा जाधव, पापाशेठ वाघरे, रघुभाई घोगले, गब्बर चावरीया, नितीन जावळे, आशुभाई पोल यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वितेसाठी शाखाध्यक्ष देवेंद्र चंदेले, उपाध्यक्ष करण गोयर, सचिव संजय बांगरे, सहसचिव प्रवीण चावरे, कार्याध्यक्ष सचिन नकवाल, सहकार्याध्यक्ष रीतेश गोयर, कोषाध्यक्ष युवराज नकवाल, संघटक लखन चावरे, संघटक विक्की बग्गन व सदस्यांनी परीश्रम घेतले.