पतंजली योग समितीचे अध्यक्ष एन.डी.माळी यांची पत्रकार परीषदेत माहिती
नंदुरबार:- युवा स्वावलंबन शिबिर घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना पतंजलीच्या वतीने नोकरी दिली जाणार आहे, अशी माहिती पतंजली योग समितीचे अध्यक्ष एन.डी.माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिबिरात सहभागी झालेल्या तरुणांमधील बुद्धिमत्ता पाहून त्यांची मुलाखत घेतली जाणार आहे, त्यातून निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना पतंजली तर्फे रीतसर नियुक्ती देण्यात येणार आहे, अशी ही माहिती पत्रकार परीषदेत देण्यात आली.