बेलव्हायमधील अल्पवयीन मुलीचे आत्महत्या प्रकरण : आरोपीचा जामीन फेटाळला

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने विनयभंगानंतर आत्महत्या केल्याची घटना 2 फेब्रुवारी रोजी घडली होती. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात पोस्को व अन्य कलमाद्वारे संशयीत आरोपी युवराज उर्फ गोलू रवींद्र नेहतेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्यास अटक करण्यात आली होती. संशयीत आरोपीतर्फे भुसावळ न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला न्या.आर.एम.जाधव यांनी तो फेटाळून लावला. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.मोहन देशपांडे तर मूळ तक्रारदारातर्फे अ‍ॅड.सत्यनारायण आर.पाल यांनी युक्तीवाद केला. सुनावणीकडे बेलव्हाय गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागले होते.