भुसावळ- तालुक्यातील बेलव्हाय गावाच्या नदीकाठावर संशयीत आरोपी अनिल पितांबर सोनवणे हा गावठी दारू गाळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर 14 हजार 100 रुपये किंमतीचे गावठी दारूचे रसायन जागीच नष्ट करण्यात आले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक दिलीप पाटील, हवालदार विठ्ठल फुशे, राजेंद्र पवार सुनील चौधरी, उमेश बारी आदींच्या पथकाने केली.