बेलसरच्या बंधार्‍याचे सुळेंच्या हस्ते जलपूजन

0

पुरंदर । बेलसर येथील पांढरेमळा वस्तीलगत कर्‍हा नदीवर बंधारा बांधून राष्ट्रवादीने आपली वचनपूर्ती केली आहे. सुमारे 1 कोटी 3 लाख रुपये खर्चाच्या या बंधार्‍याचे जलपूजन बुधवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. येथील माजी सरपंच निलेश जगताप व त्यांचे सहकारी यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी या बंधार्‍याचे काम करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार हा बंधारा पूर्ण केला असून त्याचे जलपूजन पार पडले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती सारीका इंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे, राहुल शेवाळे, माजी सरपंच बाळासाहेब जगताप, निलेश जगताप, कैलास जगताप, हनुमंत जगताप, राहुल आबनावे, सरपंच वनिता जगताप, उपसरपंच संतोष जगताप, पांडुरंग जगताप, सुजाता हिंगणे, ठेकेदार महेश इंगळे, अनिल इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या बंधार्‍याच्या माध्यमातून येथे 5 एमसीएफटी पाणी साठा होऊन पांढरे मळा, मुजावर वस्ती, रावचा मळा, पुलाचा मळा, शिंदे वस्ती, चोपण वस्ती, फंड वस्ती परिसरातील सुमारे 400 एकर जमिनीला याचा फायदा होणार असल्याचे माजी सरपंच निलेश जगताप यांनी सांगितले. तर याकामी कृषी व पशुसंवर्धन सभापती सारीका इंगळे यांनी विशेष प्रयत्न केल्याचे सांगत ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.