भोपाळ । भारत व बेलारूस याच्या मालिका सुरू होती.या मालिकेच्या शेवटचा सामना जागतिक महिला दिनी झाला.या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने निर्विवाद वर्चस्व राखले.एकही सामना पाहुण्या संघाला जिकता आला नाही.या मालिकेत 5-0 असे निर्भेळ यश मिळवले. भारताचा व बेलारूसचा शेवटचा सामना हा महिला दिनी चांगलाच रंगला. या लढतीत भारताने 3-1ने विजय साजरा केला.भारताकडून पहिला गोल वंदना कटारिया हिने 6 व्या मिनिटाला करित आघाडी घेतली.त्यांनतर गुरजित कौर हिने 15 व्या मिनिटला दुसरा गोल केला,आणि 2-0 ची आघाडी भारताने घेतली असतांना बेलारूसच्या युलिया मिखेइचीक हिने एकमेव गोल 52 व्या मिनिटाला केला.
2-1 असा स्कोर असतांना भारतीय संघाची कर्णधार राणी हिने 55 मिनिटाला गोला करून 3-1 स्कोर झाला.दोन गोलची आघाडी भारतीय महिला हॉकी संघाने शेवटपयर्ंत ठवली. पहिल्या सत्राच्या अखेरच्या मिनिटाला त्यात गुरजित कौरने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भर टाकली. पुढील दोन सत्रात मात्र दोन्ही संघांनी बचावात्मक खेळावर भर दिला. त्यानंतर बचावावर भर देत भारतीय संघाने विजयावर शिक्कामोर्तब केले.कर्णधार राणी हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बेलारूस बरोबरची मालिका 5-0 ने जिकली.