बेवारस बॅगेमुळे उडाली खळबळ…

0

जळगाव । घराबाहेर अंगणात संशयास्पद अवस्थेत भरलेली बॅग आढळून आल्याने इंद्रप्रस्थ नगरामध्ये घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी करून खळबळ उडाल्याची घटना शहराच्या इंद्रप्रस्थनगरात गुरूवारी सकाळी घडली. पोलीसांना हा प्रकार लक्षात घेताच त्यांनी बॉम्ब शोधक पथकास माहिती दिल्यानंतर पथकाने घटनास्थळी पाचारण केले. तपासणीत या बॅगमध्ये वाहनाच्या टायराच्या टुयबमध्ये गावठी दारू भरल्याचे समोर आले. नंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. ही बॅग शहर पोलीस ठाण्यात हलविण्यात आली.

अन् पोलिसात दिली माहिती
आज सकाळी इंद्रप्रस्थ नगरतील रहिवासी राम जडेजा यांच्या कुटुंबातील महिला सदस्य अंगणाची सफाई करण्यासाठी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास अंगणाची सफाई करण्यासाठी घराबाहेर पडल्या. त्यावेळी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. जडेजा कुटुंबियांनी हा प्रकार लगेच आजुबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आणून दिला. येथील रहिवासी अ‍ॅड. दिलीप पोकळे यांनी संशयास्पदरित्या बेवारस बॅगची माहिती पोलिस नियंत्रण कक्षात फोन करून बेवारस बॅग विषयी माहिती दिली. नियंत्रण कक्षाला मिळालेल्या माहितीवरून त्यांनी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला सूचना दिली. बीडीडीएस पथकाचे अरूण पाटील राजेंद्र जंगले, नंदलाल चौधरी, देवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, अतुल चौधरी हे घटनास्थळाकडे निघाले. शहर पोलिस ठाण्यातही याबाबत माहिती मिळताच दुष्यांत खैरनार, संजय भालेराव यांना घटनास्थळी रवाना झाले.

बाँम्ब शोध पथक घटनास्थळी
बीडीडीएसच्या पथकाने सकाळी 10.20 ते 10.45 वाजेपर्यंत त्यांच्या स्फोटके शोधक यंत्राने बॅगची तपसाणी केली. त्यानंतर श्वान सनी याने तपासणी केली. मात्र बॅगमध्ये संशयास्पद काहीच नसल्याचे आढळले. त्यामुळे बीडीडीएसच्या पथकाने बॅग ताब्यात घेऊन सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास बॅग शहर पोलिस ठाण्यात आणली. बीडीडीएसच्या पथकाने बॅग शहर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर आवारातच उघडली. बॅगमध्ये काळ्यारंगाचा ट्रकचा ट्यूब ठेवलेला होता. ट्यूबमध्ये 50 लिटरच्या जवळपास गावठी दारू असल्याचे उघड झाले. पथकाने दारू भरलेला ट्यूब शहर पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.