मुंबई । मुंबईसारख्या शहरात वीतभर रिकाम्या जागेची समस्या असताना, तब्बल 20 एकर जमीन वापराविना पडून आहे. त्याचे कारणही तसेच धक्कादायक आहे. अशा जुन्या आणि भंगार गाडयांची संख्या जवळपास 7 हजारांच्या घरात आहे. मुंबई पालिकेनेच याबाबतची आकडेवारी जारी केली आहे. मुंबई पालिकेने 1 जानेवारी 2016 ते 23 ऑगस्ट 2017 यादरम्यान रस्त्यावरील बेवारस गाड्यांची तपासणी केली. या जवळपास दीड वर्षाच्या काळात मुंबईत तब्बल 6 हजार 413 बेवारस गाडया आढळल्या. या गाडयांनी सुमारे 20 एकर जमीन व्यापली आहे.
पालिकेने बेवारस आढळलेल्या गाड्यांपैकी 2,826 गाड्यांचा लिलाव केला आहे, तर उर्वरित गाड्या गोडाउनमध्ये ठेवल्या आहेत. हे कमी की काय, पालिकेच्या अतिक्रमण विभागाने ऑक्टोबरमध्ये आणखी एक सर्व्हे केला. यावेळी आणखी 605 बेवारस गाड्या आढळून आल्या. त्यामुळे जवळपास 75 हजार चौरसफूट जागा व्यापला आहे. पालिकेकडे सातत्याने बेवारस वाहनांबाबत तक्रारी येत होत्या. त्यावरून महापालिकेने सव्र्हे केल्यानंतर, मुंबईतील पडीक जमीन आढळली. याबाबत माहिती देताना सहाय्यक नगरपालिका आयुक्त मधुकर मगर म्हणाले, बेवारस वाहनांवर नोटीस चिटकवून, अशी वाहने 48 तासांच्या आत उचलली जातात. वाहनांवर दावा सांगण्यासाठी मालकांना 30 दिवसांचा अवधी दिला जातो. याकाळात गाडया वरळी, अंधेरी आणि घाटकोपरमध्ये बीएमसीच्या स्क्रॅप गोडाउनमध्ये ठेवल्या जातात. आरटीओच्या मते कोणतीही कार 7 बाय 16 म्हणजेच 124 स्वेअरफूट जागा व्यापते.