बेस्टचा संप मिटत नाही तोपर्यंत कोस्टल रोडचे काम होऊ देणार नाही-मनसे

0

मुंबई – बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला आज आठवडा पूर्ण होत आला आहे. अद्याप संपावर कोणताही तोडगा काढण्यात यश आलेले नाही. मात्र यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीबरोबर चर्चा झाल्यानंतरही लेखी आश्वासन मिळेपर्यंत बेस्ट कामगार संघटना माघार घेण्यास तयार नसल्याने बेस्ट कामगारांचा संप सलग सातव्या दिवशीही सुरूच आहे.

या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वादात उडी घेतली असून आपले आंदोलन सुरू केले आहे. ‘आधी बेस्टच्या संपावर तोडगा काढा, मग कोस्टल रोडचे काम करा’, अशी मागणी करत मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. शिवाय, जोपर्यंत संप मिटत नाही तोपर्यंत कोस्टल रोडचे काम होऊ देणार नाही, असा इशारा देत मनसैनिकांनी वरळी परिसरातील कोस्टल रोडचं काम बंद पाडले आहे.