मुंबई-बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारलेला आहे. संपाला आठवडा पूर्ण होत आला आहे. मात्र अद्यापही तोडगा काढण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. आधी बेस्ट बस नीट चालवून दाखवा मगा राज्याबाबत गप्पा मारा. तुम्ही गिरणी कामगाारांचे वाटोळे केले,आता बेस्टच्या कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचे पाप करु नका असा खोचक टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंनी आधी स्वतःच्या ताब्यातील बेस्ट व्यवस्थित चालवून दाखवावी मग राज्याबाबत गप्पा माराव्यात. आधी गिरणी कामगारांचं वाटोळं केलंत आता बेस्टच्या कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचे पाप करू नका! #BESTStrike@uddhavthackeray @AUThackeray @ShivSena pic.twitter.com/MjUOAh6nYB
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 14, 2019
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून बेस्ट संपाचा फोटो ट्विट करत त्यांची भूमिका मांडली आहे. शिवसेनेने बेस्टचा संप पुकारल्यानंतर सुरुवातीला या संपाला पाठिंबा दिला होता. मात्र दोन दिवसातच त्यांनी संप मागे घेण्यास सांगितले. ज्यामुळे संतापलेल्या बेस्टमधील शिवसैनिकांनीही हा आदेश झुगारला आणि संपात सहभागी होणेच पसंत केले. तीन दिवसांपूर्वीच बेस्टचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते. अजूनही या संपावर कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळेच गेल्या सात दिवसांपासून मुंबईकरांचे हाल कायम आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरच धनंजय मुंडे यांनी हा ट्विट केला आहे.