बेस्ट कामगार कोर्टात गेले नसते तर निर्णय वेगळा असता-अनिल परब

0

मुंबई-बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी नऊ दिवस संप केला. अखेर काल उच्च न्यायालयाने मध्यस्थी करत तोडगा काढल्याने संप मागे घेण्यात आला. यावरून आज शिवसेना विधान परिषद आमदार अनिल परब यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावरून शिवसेनेला बदनाम करण्याचा षड्यंत्र असल्याची टीका केली आहे. तसेच बेस्ट कामगार कोर्टात गेले नसते तर निर्णय वेगळा असता असेही त्यांनी सांगितले आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बेस्ट कर्मचारी युनियनचे नेते शशांक राव यांनी ज्या घोष्टी घडल्या नाही त्याबाबत वक्तव्य करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. शशांक राव यांनी कामगारांचे नुकसान केले आहे. शशांक राव कोणाच्या तळावर नाचत आहे?, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री यांच्यात काय बोलणी झाली हे मुख्यमंत्र्यांनी किंवा उद्धव ठाकरे यांनी काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे त्यांच्यात काय चर्चा झाली हे शशांक रावला कोणी सांगितले? असा प्रश्न देखील आमदार परब यांनी केला आहे.

कोर्टाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. ७ हजार पगारवाढीचे कोर्टाने सांगितलेले नाही. प्रत्यक्षात ३ ते ३.५ हजाराचीच पगार वाढ होणार आहे. संप काळातील पगार कापले जाणार नाही असे कोर्टाने कोठेही सांगितलेले नाही असे आमदार परब यांनी सांगितले आहे.