मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्याभरापासून संप पुकारलेला आहे. प्रशासन यावर तोडगा काढण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. दरम्यान काल राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीनं बेस्ट कामगारांच्या मागण्यांबद्दलचा अहवाल उच्च न्यायालयात अहवाल सादर केला. त्यामुळे बेस्टचा संप मिटेल असे वाटत होते, मात्र आज नवव्या दिवशीही संप सुरुच आहे.
बेस्ट कामगारांचा संप मिटवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंशी संवाद साधला होता. लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. आज नवव्या दिवशीही बेस्ट कामगारांचा संप सुरूच राहणार आहे. सकाळी होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेतं, यावर या संपाचं भवितव्य अवलंबून असणार आहे.