बॉक्स ऑफिसवर ‘झिरो’ ठरला खरंच झिरो!

0

मुंबई : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा ‘झिरो’ चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरुखसोबत मुख्य भूमिकेत अनुष्का शर्मा आणि कतरीना कैफही आहेत. तगडी स्टारकास्ट पाहून या चित्रपटाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, पुन्हा एकदा शाहरुखने प्रेक्षकांना निराश केलं आहे.

https://twitter.com/Aamirs_Batman/status/1075980531815264257

शाहरुखचा ‘झिरो’ पाहून चित्रपटगृहाबाहेर आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आता मीम्समधून पाहायला मिळत आहेत. या मीम्सद्वारे झिरोची खिल्ली उडवली आहे. तीनही खानची जादू आता ढळली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.