बॉक्स ऑफिसवर ‘सिंबा’ ठरतोय हिट!

0

मुंबई :‘सिंबा’ चित्रपट २८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २०.७२ कोटींचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे.

दुसऱ्या दिवशी चित्रपटाने २३.३३ कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाने दोन दिवसात ४४.०५ कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटांप्रमाणेच हा चित्रपटही सुपरहिट ठरणार असल्याचे दिसून येत आहे.