मुंबईः भाजपने लोकसभा निवडणूकीत एका बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला तिकीट देवून लोकशाहीवर मोठा हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. भाजपने मालेगांव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकुन यांना भोपाळमधुन लोकसभेची उमेदवारी दिली होती. साध्वी प्रज्ञासिंग ह्या या निवडणुकीत विजयी देखील झाल्या आहेत. यावरुन शरद पवार यांनी भाजपवर टिका केली आहे.