कराची:-कराची स्टॉक एक्सजेंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तान भारताला जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचा आरोप हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील अन्य देशांना मान्य नाही.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, परराष्ट्र मंत्री मकदूम शाह महमूद कुरेशी यांनी कुठलेही पुरावे न देता या हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरले आहे. पाकिस्तानकडून होणारे हे सर्व आरोप भारताने फेटाळून लावले आहेत. भारतावर आरोप करुन कुरेशी यांनी वातावरण दूषित केले. त्यामुळे हा विषय सुरक्षा परिषदेने हाताळू नये असे मत UNSC च्या सदस्यांनी व्यक्त केले आहे.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तान स्टॉक एक्सजेंच्या इमारतीवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतवादी स्टॉक एक्सचेंज इमारतीबाहेर गाडीतून उतरले व त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. स्टॉक एक्सचेंजच्या मुख्य प्रवेशद्वारावर ग्रेनेड फेकून इमारतीत घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला.