बॉलबॅडमिंटन स्पर्धेत जी.जी. खडसे महाविद्यालयाला दुहेरी मुकूट

0

मुक्ताईनगर : बोदवड महाविद्यालयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत जळगाव विभागाच्या आंतर महाविद्यालयीन बॉलबॅडमिंटन स्पर्धा पार पडल्या. त्यात खडसे महाविद्यालयाने बॉलबॅडमिंटन स्पर्धेत पुरुष व महिला संघाने विजेतेपद पटकाविले. यामध्ये जी.जी. खडसे महाविद्यालयाच्या महिला व पुरुष दोन्ही संघांनी एकतर्फी विजय नोंदविला. आपला पहिला सामना कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय वरणगाव, दुसरा सामना मू.जे. महाविद्यालय जळगाव अंतीम सामना शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्याविरुध्द खडसे महाविद्यालयाच्या संघाने 2-0 अशा सरळ सेटने एकतर्फी विजयाची नोंद केली.