विशाखापट्टणम : स्वरा भास्करने म्हंटली महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना सर्व क्षेत्रात होत असतात, त्याला बॉलिवूड अपवाद नाही. विशाखापट्टणम येथे आयोजित सोशल मीडिया समिटमध्ये ती बोलत होती.
तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपानंतर भारतात #MeToo मुव्हमेंट सुरू झाली. अनेक अभिनेत्री आणि महिला यात सामिल झाल्या आणि बॉलिवूडला हादरा बसला. अनेक अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक यांना आपले काम सोडून द्यावे लागले. त्यानंतर एम. जे. अकबरसारख्या मात्तबर नेत्याला आपले मंत्रीपद सोडावे लागले होते.