बॉलिवूड कलाकारही सईच्या अभिनयाच्या प्रेमात

0

मुंबई: ‘लव सोनिया’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये मराठी सिनेमाची अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा अभिनय प्रशंसनीय असून बॉलिवूड कलाकारही तिच्या अभिनयाच्या प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे.

बॉलिवूडमधल्या अनिल कपूर, कॅटरीना कैफ, विकी कौशल अशा अनेक सेलिब्रिटींनी लव सोनिया चित्रपट पाहिल्यानंतर सईचे कौतुक केलं. ‘लव सोनिया’ चित्रपटात सईचा आत्मविश्वास हे सारं बॉलिवूड चाहत्यांची मनं जिंकून घेणारं होतं. सईने ‘गजनी’, ‘ब्लॅक एन्ड व्हाइट’, ‘हंटर’, चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.