प्रियांका चोपडा हिची आता मिस वर्ल्ड अशी ओळख राहिलेली नाही. आता ती हॉलिवूडची अभिनेत्री बनली आहे. फॅशन आणि गॅमलरच्या जगात प्रियांकाने यशाचे झेंडे रोवले आहेत. याचे पुरावे ती वेळोवेळी देत असते. नुकतेच प्रियांकाने एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले. ज्यातील एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या फोटोत प्रियांकाने लाल रंगाचा ड्रेस घातला असून त्यात ती सुंदर दिसत आहे. मात्र या तिच्या रुपात आश्चर्य वाटणारी गोष्ट ही आहे की, तिने केसांचे घातलेले वंगण.
याशिवाय प्रियांकाने अजून काही फोटो शेयर केले आहेत, ज्यात ती तिच्या ग्लॅमर अवतारात अधिकच उठावदार दिसत आहे. गुलाबाच्या फुलांचा सुगंध घेत असतांनाचा हा फोटो आहे, ज्या ती अगदी साध्या आणि नेहमीच्या पोषाखात आहे. प्रियांकाने नुकतेच तिच्या परिवारासोबत सुटी घालवून ती पुन्हा कामावर रुजू झाली आहे.