मुंबई : टीव्हीची नागिन मोनी रॉयने ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. आता ती पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गोल्ड माफियांवर आधारित असलेला ‘केजीएफ’ चित्रपटात मौनी रॉय देखील दिसणार आहे. या चित्रपटातून नवीन कुमार गौडा (यश) दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत करणार आहे.
मौनी या चित्रपटात एका आयटम साँगवर थिरकणार आहे. जॅकी श्रॉफ आणि संगीता बिजलानी यांच्या त्रिदेव चित्रपटातील गली गली मैं फिरता है या गाण्याचे हे रिक्रिएट व्हर्जन असणार आहे. येत्या २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.