मारहाण करणार्या तिघांंनी बांधला होता तोंडाला रुमाल ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव : घराच्या कुपनात आधीच दबा धरुन बसलेल्या तसेच तोंडाला रुमाल बांधलेल्या तिघांनी घरी आलेल्या बॉश कंपनीचे व्यवस्थापक महेश रमेश कोरे (वय 36) यांना हॉकिस्टिकसह, बांबू तसेच काठीने बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. कंपनीतून काहींना कामावरुन काढून टाकल्याने संबंधित तरुणांनी मनात राग ठेवून मारहाण केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
बॉश कंपनीत मनुष्यबळ विभागाचे प्रमुख असलेले महेश गोरे हे शुक्रवारी कामावरुन रात्री पावणे अकरा वाजता कारने (क्र.एम.एच.19 ए.पी.3622) घरी आले. कुंपनात गाडीने प्रवेश केला. गाडीतून खाली उतरताच कुंपनात आधीच दबा धरून बसलेल्या तिघां अनोळखी तरुणांनी कोरे यांच्या पायावर हॉकिस्टीकने तर एका लाकडी दांडक्याने गुडघ्यावर बेदम मारहाण केली. चालक गाडीतून उतल्यावर तिघांना पळ काढला व एक दुचाकी आली व त्यावर बसून पसार झाले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. कोरे कंपनीत शिस्त लावत असून काहींना त्यांनी कामावरुन काढून टाकले आहे. त्यामुळे काहींनी वैमनस्यातून हे कृत्य केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान यापूर्वीही अशाप्रकारे याच कंपनीतील एका अधिकार्यांना मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे. या पुढील गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे करीत आहेत.