चाळीसगाव । तालुक्यातील कळमडु येथुन चोरलेला बोकड मेहुणबारे येथे आठवडे बाजारात विक्री करणार्या तिघांना मेहुणबारे पोलीसांनी शुक्रवारी 8 रोजी ताब्यात घेतले. तिघांना 9 रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की करमुड येथील गोपाल सोमा मालचे यांच्या शेडमधुन त्यांच्या मालकीचा 11 हजार रुपये किमतीचा बोकड 4 ते 5 सप्टेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता.
त्यांनी बोकडचा शोध घेतला मात्र मिळुन आला नाही. बोकड आरोपी विक्रीसाठी मेहुणबारे येथे घेऊन येतील म्हणुन फिर्यादी गोपाल मालचे यांनी 8 रोजी मेहुणबारे येथील आठवडे बाजारात पोलीसांना सोबत घेवुन शोध घेत असतांना त्यांचा बोकड आरोपी भाईदास भिकन वाघ, कैलास अवचित वाघ दोघे शिरुड जिल्हा धुळे व संजय भिका गायकवाड उंबरखेड (चाळीसगाव) हे विक्रीसाठी घेवुन आले होते. पोलीसांनी त्यांना बोकडसह ताब्यात घेवुन त्यांच्यावर मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील करीत आहेत.