शिंदखेडा येथे भिल समाज विकास मंच वतीने तहसिलदास निवेदन
शिंदखेडा –भिल समाज विकास मंच व एकलव्य भिल जनसेवा मंडळ वतीने तहसिलदार सूदाम महाजन यांना विविध विषयांचे निवेदन देण्यात आले. सुरुवातीला शहरातुन मोर्चा काढण्यात काढण्यात आला.विविध घोषणा देत सनदशीर मार्गाने तहसिल वर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसिलदार सुदामा महाजन यांना निवेदन देण्यात आले.
काय म्हटले आहे निवेदनात
निवेदनात शेवाडे व वरझडी येथे नुकत्याच झालेल्या उषाबाई देवमन निकुंभ, सतिष चेतन कोळी यांनी ग्रा.पं.सरपंच निवडणुकीत बोगस जातीचा दाखला घेऊन निवडणूक लढविली आहे म्हणून त्यांच्या जातीच्या दाखल्याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी व गुन्हा दाखल करावा. आदिवासी मुलीबद्दल आक्षेपार्ह वर्णन असलेल्या कविता संग्रहावर बंदी आणुन कवी दिनकर मनकर यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. शिंदखेडा शहर व तालुक्यातील आदिवासी भिल्ल समाज मोठ्या प्रमाणात असुन शबरी घरकुल योजना राबविण्यात यावी शिंदखेडा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आदिवासी समाज बेरोजगार झालेला आहे तरी शासनाने स्थानिक ठिकाणी त्वरीत रोजगार उपलब्ध करावा व खावटी वाटप करण्यात यावी. आजही आदिवासी समाज कागदपत्र अभावी रेशन कार्ड पासुन वंचित आहेत तरी शासनाने सर्हे करुन समाजाला बी.पी.एल.रेशनकार्ड देण्यात यावे आदिवासी विभागाने शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी च्या एकुण संख्येच्या प्रमाणात मागील २० वर्षात किती निधी खर्च झाला याची एस.आय.टी.चोकशी व्हावी. आदिवासी लोकांना स्वाभिमानी जिवन जगण्यासाठी आदिवासी लोकांना थेट ५ ते १० लाख रु कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. वरील मागण्या व कारवाई न झाल्यास आदिवासी समाज मुंबई आग्रा रोड माळीच गोराणे फाटा येथे रास्ता रोको करण्यात येईल त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील.
यांची होती उपस्थिती
यावेळी दिपक दशरथ अहिरे अध्यक्ष भिल समाज विकास मंच तथा नगरसेवक, माजी नगराध्यक्ष गुलाब सोनवणे, बापु ठाकरे, संजय मोरे,नरेश मालचे, दिपक ठाकरे, देवीदास मोरे, सुनिल सोनवणे, गणेश सोनवणे, चंदु सोनवणे, बापु हांडे, बन्सीलाल सोनवणे यांसह समाजातील मोठ्या संख्येने महिला व समाज बांधव सहभागी झाले होते.