बोदवडच्या तरुणीचा विनयभंगप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा

0

बोदवड- अल्पवयीन तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी शोएब खान ईमाम खानविरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 17 वर्षीय पीडीत तरुणीचा आरोपीने 19 नोव्हेंबर ते 19 डिसेंबरदरम्यान पाठलाग केला तसेच आठवडे बाजारात विनयभंग केल्याचा आरोप आहे. तपास पोलिस निरीक्षक राजमहेंद्र बाळदकर करीत आहेत.