बोदवड : बंद घरे चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडत असून चोरट्यांनी दोन घरे फोडून सुमारे सात लाखांचा ऐवज लांबवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे.
एकाचवेळी दोन ठिकाणी घरे फोडली
कोटेचा नगर, स्वामी समर्थ केंद्राजवळील रहिवासी गजानन लक्ष्मण चौधरी हे आपल्या कुटुंबीयांसोबत सुरत येथे लग्नाला गेल्याने घर बंद असल्याची चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी दोन लाखांची रोकड व चार लाख 86 हजार रुपयांचे दागिने लांबवले तसेच चंद्रकांत सोसायटी, भुसावळ रोडमधील रहिवासी राहुल प्रकाश हिवराळे हे हाताला दुखापत झाल्याने उपचारासाठी जळगाव येथे गेल्यानंतर बंद घर पाहून चोरट्यांनी 73 हजार रुपये रोख व एक लाख 65 हजार 500 रुपयांचे दागिने लांबवले. दोन्ही चोर्या 4 ते 5 मार्चच्या मध्यरात्री घडल्या. डीवायएसपी विवेक लावंड, बोदवड पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी घटनास्थळी पाहणी केली.